शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेच्या आठ समित्यांत भाजपच्या १०९ खासदारांचे नाव समाविष्ट आहे तर काँग्रेसचे ३३, तृणमूलचे १४, समाजवादी पक्षाचे चार, अण्णाद्रमुकचे तीन आणि इतर पक्षांच्या ८० सदस्यांचा समावेश आहे.
भाजपचे ३६ टक्के खासदार असे आहेत की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही संसदीय समितीच्या बैठकीत भाग घेतलेला नाही. इतर पक्षांत काँग्रेस १५ टक्के, तृणमूल काँग्रेस ५७ टक्के आणि इतर पक्षांचे ५५ टक्के खासदार समाविष्ट आहेत.
सरकारने अनौपचारिकरित्या हे आकडे उपलब्ध करून दिले. परंतु, याचा खुलासा केला नाही की, सत्ताधारी पक्षाचे ३६ टक्के खासदार वेगवेगळ्या संसदीय समित्यांचे सदस्य आहेत पण कोण? सरकार ती सगळी नावे का सांगत नाही? प्रामुख्याने ज्या खासदारांची नावे समोर आली आहेत त्यात असद्दुदीन ओवेसी, नकुल नाथ, राजीव सिंह, सुमनलता अमरीश, मिमी चक्रवर्ती, एस.जगदरकक्षण, वाय. एस. अविनाश रेड्डी, राजीव प्रताप रुडी, सुखवीर सिंह बादल आणि अनंत कुमार हेगडे यांचा समावेश असून हे सगळे लोकसभा सदस्य आहेत.या खासदारांचा समावेशराज्यसभेतील ज्या खासदारांची नावे समोर आली आहेत त्यात सतीशचंद्र मिश्रा, डेरेक ओब्रायन, आर. सी. पी. सिंह, माजीद मेनन, एस. आर. बालसुब्रण्यम, शशीकला पुष्पा रामस्वामी, वंदना चव्हाण, सोनल मानसिंह, अनिल बलूनी, एम. पी. वीरेंद्र कुमार, रुपा गांगुली, कहकशां परवीन, डी. श्रीनिवास, जे. के. मणी, परीमल नाथवानी यांचा समावेश आहे.