लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावती दौरा सोमवारपासून सुरू होत आहे. यात ते दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. सात शहरांमधून ते ५,३०० किमीहून अधिक प्रवास करणार आहेत. ३६ तासांत ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी दिल्लीहून मध्य प्रदेशात जातील. त्यानंतर ते दक्षिणेत केरळमध्ये जाणार आहेत.
दिल्ली ते खजुराहो, असा ५०० किमीचा प्रवासnअधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे दिल्ली ते खजुराहो, असा ५०० किमीचा प्रवास करतील. त्यानंतर राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रिवा येथे जातील. nतेथून खजुराहोला परत येतील. त्यानंतर ते कोची येथे जाणार आहेत. १,७०० किमीचे अंतर कापून ते युवा कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होतील.