नवी दिल्ली : नव्या खासदारांसाठी अत्याधुनिक स्वयंपाकघर, चार शयनगृहे, लिफ्ट आणि कार्यालय अशा सुविधा असलेल्या ३६ सदनिका ल्यूटन्स दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू येथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती भवन सहज दृष्टीक्षेपात येणाऱ्या या सदनिकांचे बांधकाम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, या सर्व नव्याने बांधलेल्या सदनिका लवकरच लोकसभा सचिवांकडे सुपूर्द केल्या जातील. या इमारतींत सौर यंत्रणा, एलईडी दिवे, पार्किंग यांसारख्या सुविधा आहेत. ३६ सदनिकांसाठी ९२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, ८० कोटी रुपयांत हे काम पूर्ण करण्यात आले. सदनिकांचे बांधकाम आॅक्टोबर २०१७मध्ये सुरू केले होते, असेही या अधिकाºयाने सांगितले. लोकसभेत प्रथमच निवडून आलेले ३०० खासदार अहेत. त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेटपटू गौतम गंभीर, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, स्मृती इराणी, गायक हंस राज हंज , बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती व नुसरत जहाँ रुही यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून १४ जण पहिल्यांदा खासदार झाले आहेत.केंद्र सरकारने सध्या ३५० खासदारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यातील काही खासदारांची वेगवेगळ््या ठिकाणी व्यवस्था केली जाईल, असेही अधिकाºयाने सांगितले. २०१४ मध्ये खासदारांची पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, खर्चात कपात करण्यास यंदा त्यांची विविध राज्यांच्या सदनांमध्येच व्यवस्था केली आहे.नॉर्थ अव्हेन्यूला प्राधान्यकाही दशकांपूर्वी याच जागेवर बांधण्यात आलेल्या सदनिका पाडून तेथे हे नवे बांधकाम सुरू करण्यात आले होते. साऊथ आणि नॉर्थ अव्हेन्यू येथे जुन्या सदनिका होत्या. मात्र, आम्ही टप्प्याटप्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेत नॉर्थ अव्हेन्यूतील कामाला प्राधान्य दिल्याचे अधिकाºयाने सांगितले.