शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
3
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
4
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
5
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
6
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
7
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
8
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 5:50 AM

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्याला आपला नवा तळ बनवला आहे. सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी आणखी पाच जवानांची हत्या केली. या भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत शहीद झालेल्या जवानांची संख्या ३६च्या वर पोहोचली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी १२ नागरिकांचीही हत्या केली. 

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. या वर्षी २२ नोव्हेंबर आणि आता २१ डिसेंबरला अवघ्या महिनाभरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या वर्षी ६ मे रोजी तब्बल १० महिन्यांनी दहशतवाद्यांनी दरहालमध्ये जवानांवर हल्ला केला हाेता.  त्यात पाच जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने अद्याप पकडलेले नाही. 

दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनची मदतnलष्करी जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने लष्करी हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच लष्करातील श्वान पथकांची मदत घेण्यात आली आहे. nया मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजौरी, पुंछ भागात घातपाती कारवाया करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.nत्यांची संख्या ७ ते १० आहे. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दोन लष्करी वाहनांवर ढेरा की गली आणि बुल्फियाझ मार्गावर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद व दोन जण जखमी झाले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला