नवी दिल्ली : सध्याचे देशव्यापी ‘लॉकडाऊन’ २४ मार्च रोजी लागू झाल्यापासून १७ एप्रिलपर्यंत केंद्र व अनेक राज्य सरकारांच्या विविध कल्याण योजनांच्या १६ कोटी लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये एकूण ३६, ६५९ कोटी रुपयांची रक्कम ‘डीबीटी’ पद्धतीने थेट जमा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने रविवारी दिली. ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी ‘पब्लिक फिनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम’ (पीएफएमएस) या संगणकीय यंत्रणेचा उपयोग करण्यात आला. चालू वित्तीय वर्षांत लाभार्थींना द्यायच्या एकूण रकमेपैकी ४५ टक्के रक्कम अशा थेट पद्धतीने जमा करण्यात आली आहे. साथीला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे गरीब वर्गासाठी रक्कम दिली जात आहे. महिलांच्या नावावर असलेल्या प्रत्येक‘जनधन’ खात्यात ५०० रुपये अशा प्रकारे एकूण १९.८६ कोटी महिलांच्या खात्यांमध्ये मिळून ९,९३० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
१६ कोटी लाभार्थींच्या खात्यांत ३६ हजार कोटी थेट जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:31 AM