शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

60 वर्षांवरील 366 खासदार घेणार लस; ४६ मंत्र्यांसह सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 4:59 AM

संसदेचे अधिवेशन ८ मार्च रोजी सुरू होत असून, बहुसंख्य खासदार त्याचवेळी लस घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पी. चिदम्बरम यांच्यासह प्रफुल पटेल, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे अशा अनेक नेत्यांनाही लस दिली जाईल.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यापाठोपाठ देशातील ६० हून अधिक वय असलेले ३६६ खासदारही आता कोरोवरील लस लवकरच घेतील. त्यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, रामदास आठवले यांच्यासह ४६ मंत्री आहेत. काही मंत्र्यांनी आजच लस घेतली, तर काही जण उद्या, मंगळवारी घेणार आहेत. 

   संसदेचे अधिवेशन ८ मार्च रोजी सुरू होत असून, बहुसंख्य खासदार त्याचवेळी लस घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पी. चिदम्बरम यांच्यासह प्रफुल पटेल, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे अशा अनेक नेत्यांनाही लस दिली जाईल. पीयूष गोयल यांचे वय कमी आहेत आणि त्यांना अन्य व्याधी नाहीत. ते बहुधा नंतर लस घेतील. शरद पवार यांनी सोमवारी मुंबईतच लस घेतली. लोकसभेतील २१७ व राज्यसभेतील १४९ सदस्यांचे वय ६० हून अधिक आहे. मोदी मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५९.६३ आहेत, तर या लोकसभेतील सदस्यांचे सरासरी वय ५४ आहे. याशिवाय विविध राज्यांतील ४१२७ पैकी सुमारे २४ आमदारांचे वय ६० हून अधिक आहे. त्यांनाही आताच लस दिली जाईल. 

बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लसबिहारमध्ये सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही देण्यात येणाऱ्या लसींचा सर्व खर्च नितीशकुमार सरकार करणार आहे. बिहारमध्ये मोफत कोरोना लस दिली जाईल असे आश्वासन एनडीएने विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिले होते. 

आता आत्मविश्वास वाढेलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेण्यास टाळाटाळ करणारे आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धेही आता लस घेण्यास तयार होतील. पंतप्रधानांनी लस घेतली असल्याने त्यांनाही लसीविषयी विश्वास वाढेल, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे.

जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट?जर्मनीतील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे नीट पालन न केल्यास फैलावाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी दिला आहे. अशी लाट आल्यास जर्मनीत अतिशय कडक लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

११.४६ कोटी रुग्ण जगभरातजगभरात ११ कोटी ४६ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ९ कोटी २ लाख जण बरे झाले. अमेरिकेमध्ये २ कोटी ९२ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ९६ लाख लोक बरे झाले. त्या देशात ९० लाख लोकांवर उपचार सुरू आहेत व सव्वापाच लाख लोकांचा बळी गेला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ५ लाखांहून अधिक रुग्ण असून त्यातील २ लाख ५५ हजार जण मरण पावले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस