पदवीधरसाठी ३७ हजार मतदारांची नोंदणी नाव नोंदणीसाठी शेवटचे पाच दिवस: इच्छुकांची डोकेदुखी वाढली
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM
अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ातील ३७ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत ५ नोंव्हेबर आहे़ पुढील पाच दिवसांत २० हजार मतदार नोंदणी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़
अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३७ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत ५ नोंव्हेबर आहे़ पुढील पाच दिवसांत २० हजार मतदार नोंदणी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़नाशिक पदवीधर मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे़ निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने जुनी मतदारयादी रद्द केली़ गत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८९ हजार मतदार होते़ जुनी मतदारयादी रद्द होऊन नव्याने मतदार नोंदणी अभियान युध्दपातळीवर सुरू आहे़ गेल्या महिनाभरात ३७ हजार ९६२ मतदारांनी नोंदणी केली़ यापूर्वी नोंदणी करणार्यांनादेखील नव्याने २० मुद्यांच्या माहितीसह नोंदणी करणे बंधनकारक आहे़ प्रशासनाने तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसील कार्यालयांमार्फत मतदार नोंदणी अभियान सुरू केले़ पूर्वी केलेली नोंदणी रद्द झाल्याने नवीन नोंदणी करण्यास मतदार पुढे येत नाहीत़राजकीय पक्षांनी अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू केली, परंतु नोंदणीची आकडेवारी वाढली नाही़ पुढील पाच दिवसांत किती नोंदणी होते,यावरच निवडणुकीच्या मतदारांची संख्या ठरणार आहे़ पदवीधरची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांकडून २० मुद्यांची माहिती मागविली होती़ जुन्या मतदारांकडून ही माहिती मागविली गेली़ मात्र ८९ हजार मतदारांपैकी ३० हजार मतदारांनीच फक्त माहिती दिली़ उर्वरित ६० हजार मतदारांची माहिती आली नाही़ माहिती न देणार्या मतदारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते़ पण, जुनी यादी रद्द झाल्याने राजकीय पक्षांना मोठा फटका बसला़ त्यात काही इच्छुकांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली होती़ पण, यादी रद्द झाल्याने मतदारांची नव्याने नोंदणी करून घेण्यातच इच्छुकांचा सर्वाधिक वेळ खर्च होत आहे़ नव्याने बिनचूक यादी तयार होणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत़़़़़़़़़़़़़़़़़ इच्छुकांना थोपविण्याचे आव्हाननाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रशांत पाटील तर काँग्रेसकडून तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे़ राष्ट्रवादीकडून कोते यांच्या नावाची चर्चा आहे़ कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या मैदानात चार उमेदवार असतील, असे चित्र सध्या तरी दिसते़