नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये ३,७५,०५८ महिला (१८ वर्षांपेक्षा जास्त) तर ९०,१११ लहान मुली बेपत्ता झाल्या असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ५६,४९८ महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
महिलांवरील गुन्ह्यांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राने अनेक कडक कायदे केले आहेत. यामध्ये गुन्हेगारी कायदा (सुधारणा), २०१८ मध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार झाल्यास मृत्युदंडसारख्या दंडात्मक तरतुदींचाही समावेश आहे.
कुठे किती महिला गायब झाल्या?
महाराष्ट्र - ५६,४९८ मध्य प्रदेश - ५५,७०४
प. बंगाल- ५०,९९८
ओडिशा- २९,५८२
किती महिला मुली बेपत्ता २०२० ३२०,३९३ ७१,२०४२०१९ ३१८,४४८ ७३,५०९