शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

देशात पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाच्या ३७८७ धाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 5:27 AM

२९ प्रकरणांत दोषसिद्धी : देशभरात ५८९० कोटींची संपत्ती केली जप्त

हरीश गुप्तानवी दिल्ली : अजब वाटत असले, तरी खरे आहे. गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाने देशभरात ३७८७ समूहांवर धाडी टाकून जप्तीची मोहीम राबविली. यापैकी ५० टक्के प्रकरणांत खटले भरण्यात आले. प्राप्तिकर विभागाला १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी करता आली. याच अवधीत १८ प्रकरणांत कोर्टाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले.

केंंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांतील एकूण निष्पत्तीवर नजर टाकल्यास कार्पोरेट आणि समूहांनी दडविलेले उत्पन्न आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्राप्तिकर विभागाने लढा देण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचे दिसते. 

११५ खटले    उदाहरणार्थ, २०१७-१८ दरम्यान प्राप्तिकर विभागाने ५६० प्रकरणांत खटले भरून २३ प्रकरणांत दोषसिद्धी केली; परंतु, पुढच्या वर्षांत ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने हाती काहीही पडले नाही. तथापि,  ५ संस्थांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  त्यानंतर खटल्यांची संख्या सातत्याने कमी होत गेली.     २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल करण्यात आल्यानंतर पुढच्याच वर्षी ही संख्या १४५ आणि २०२१-२२ मध्ये ११५ वर आली.

६८९९ प्रकरणे प्रलंबित३१ मार्च २०२२ पर्यंत ६८९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. अर्थात, प्राप्तिकर विभागाने गेल्या पाच वर्षांत  ५८९० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली.

प्राप्तिकर विभागाच्या वर्षनिहाय धाडी २०१७ -१८        ५८२२०१८-१९        ९६६ २०१९-२०        ९८४ २०२०-२१        ५६९२०२१-२२        ६८६ (संसदेत सरकारने दिलेली माहिती)

n    २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल n    ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने मोठे यश नाहीn    १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयCrime Newsगुन्हेगारी