शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

३८ कोळसा खाणी सार्वजनिक क्षेत्राला

By admin | Published: March 24, 2015 11:41 PM

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन, डीव्हीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियासह केंद्र आणि राज्यांतील ३८ सार्वजनिक क्षेत्रांना सरकारने मंगळवारी ३८ कोळसा खाणींचे वाटप केले.

नवी दिल्ली : नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन, डीव्हीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियासह केंद्र आणि राज्यांतील ३८ सार्वजनिक क्षेत्रांना सरकारने मंगळवारी ३८ कोळसा खाणींचे वाटप केले. सरकारने ३३ कोळसा खाणींचा खासगी कंपन्यांना लिलाव केला. त्यातून त्याला दोन लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या लिलावातून सरकारला १.८६ लाख कोटी रुपये मिळतील असा अंदाज देशाच्या महालेखापालांनी (कॅग) व्यक्त केला होता हे विशेष. या लिलावानंतर सरकारने ३८ कोळसा खाणी दिल्या, असे कोळसा खात्याचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले.मूळ योजनेनुसार सरकार ४३ कोळसा खाणी देणार होते परंतु प्रत्यक्षात ३८ खाणींच निश्चित झाल्या. काही खाणींसाठी अर्जच आले नाहीत, असे स्वरुप म्हणाले. स्टील अ‍ॅथॉरिटीला दिलेली एकमेव सीतानला ही खाण वगळता अन्य सगळ््या खाणी या वीज निर्मिती क्षेत्राला देण्यात आल्या आहेत. सरकारच्या यादीनुसार ३८ खाणींपैकी आठ खाणी (बरजोरा,बरजोरा (उत्तर), गंगारामचाक, गंगारामचाक भदुलिया, तारा पूर्व आणि तारा पश्चिम, पचवारा उत्तर आणि कास्टा पूर्व) पश्चिम बंगाल वीज निर्मिती महामंडळाला मिळाल्या आहेत. कर्नाटक वीज महामंडळाला बारंज एक, दोन, तीन आणि चार आणि मनोरा दीप आणि किलोनी खाणी मिळाल्या. नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनने (एनटीपीसी) छट्टी बरियातू, छट्टी बरियातू (दक्षिण), केरनदरी, तलायपल्ली आणि दुलंगा या खाणी पटकावल्या. खरगा जॉयदेव खाण दामोदर व्हॅली कार्पोरेशनला मिळाली. राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगमला परसा पूर्व, कांता बसन आणि परसा खाणी मिळाल्या तर छत्तीसगढ राज्य वीज निर्मिती कंपनीला गारे पालमा विभाग तीन, गिधमुरी आणि पटोरिया खाणी मिळाल्या.४ओडिशा कोळसा आणि वीज निर्मितीने मनोहरपूर व मनोहरपूर डीपसाईड खाण मिळविली. या ३८ खाणींपैकी बहुतेक खाणी या आधी ज्यांना मिळाल्या होत्या त्यांनाच आताही मिळाल्या आहेत. ४गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. हे खाण वाटप निर्दोष झालेले नव्हते असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्या कोळसा खाणींचा आता लिलाव झाला आहे.