नवी दिल्ली - देशातील वातावरण सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसी या दोन कायद्यांमुळे चांगेलच तापले आहे. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसा झाली आहे. आता आसाममधील एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. या यादीतून तब्बल 38 वर्षे देशाची सेवा करणाऱ्या वायू दलातील एका अधिकाऱ्याचे नाव गायब झाले आहे.
आसाममध्ये शनिवारी एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतीय वायू सेनेच्या माजी अधिकाऱ्याचे नावच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सपूर्ण कुटुंबाचे नाव या यादीत समाविष्ट आहे. निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट छबिंद्र सरमा आसाममधील विश्वनाथ चरवाली येथील रहिवासी आहेत.
एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर या यादीतून 19 लाख लोकांचे नाव गायब आहे. 57 वर्षीय सरमा यांना आपले नाव नसल्याचा विश्वासच बसत नाही. आपल नाव एनआरसीमध्ये नसने ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला कोणाविषयी तक्रार करायची नाही. पण तीन वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही आपले नाव आले नाही. एनआरसीमध्ये माझ नाव स्पष्ट करावे. मी भारतीय म्हणून जन्माला आलो आहे. भारतीय वायु सेनेतून देशाची सेवा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.