नवी दिल्ली - इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयंना इसिसने मारल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी आज मंगळवारी राज्यसभेत बोलताना दिली आहे. यामध्ये अनेकजण पंजाब राज्यातील आहेत. 2014 मध्ये मोसुलमधून काही भारतीयांचे अपहरण झालं होतं. इसिसने 39 भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. 38 लोकांचा डीएनए जुळला आहे तर एकोणचाळीसाव्याचा डीएनए 70 टक्के जुळला आहे.
तीन वर्षापूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने मोसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांचे अपहरण केलं होतं.
काय म्हणाल्या सुषमा स्वराज ?
- हरजीत मसीह यांनी सांगितलेला प्रकार खोटा आहे. मोसुलमध्ये 39 भारतीय मारले गेले.
- एका केटररने सांगितले की, सर्वांना इसिसने टेक्सटाइल फॅक्टमध्ये घेऊन गेले होते. तेथे बांगलादेशी आणि भारतीय नागरींकाना वेगळं ठेवण्यात आलं.
- हरजीतला बांगलादेशचा अली म्हणून बाहेर काढल्याचे केटररने सांगितले.
- यापूर्वी संसदेत याविषयावर मी निवेदन दिले होते, त्यावेळी इराकचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते.
- व्ही.के सिंह यांच्यासह अन्य आधिकारी इराकमध्ये बेपत्ता भारतीयांचा शोध घेत होते त्यावेळी तिथे 'डीप पेनिट्रेशन' मागितले होते.
- जमिनीमध्ये भारतीयांना गाढल्याची आमची शंका होती.
- सध्या भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाले आहे. डोंगर खोदून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये लोकांचा सापळा मिळाला आहे.
- डीएनए टेस्टमध्ये सर्वात प्रथम संदीप नावाच्या भारतीयाचे नाव समोर आले. काल आणखी 38 भारतीयांचा डीएनए मॅच झाला आहे.
- परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके सिंग यांची मी आभारी आहे. त्यांनी ध्येर्याने हे सर्व प्रकरण हाताळले.
असे झाले अपहरण - इराकमध्ये अपहरण झालेल्या 38 भारतीयांमध्ये पंजाबमधील लोक आधिक आहेत. ते सर्व मोसुल आणि त्याच्या जवळील शहरामध्ये मजुरी करत होते. 2014मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने मेहसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांना एका तुरुंगात ठेवलं होते. त्यावेळी तिथे बांगलादेशी आणि भारतीय नागरिकांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. यावेळी इसिसने त्यांच्याकडून मजुरी करुन घेतली होती.