शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

तामिळनाडूत ३९ जागा : अद्रमुक-भाजपा युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:36 AM

आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले.

चेन्नई : आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले.भाजपाशी युती करणे, जागावाटप, प्रचारमोहिम, जाहीरनामा या सर्व गोष्टींवर साकल्याने विचार करण्यासाठी अण्णा द्रमुकने आपल्या पक्षनेत्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन भाजपाशीयुती करण्याच्या निर्णयावर १० फेब्रुवारीनंतर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविण्यात आले.तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा असून त्यातील किमान २४ जागा अण्णाद्रमुक हव्या आहेत. त्यानंतर उरलेल्या जागांचे भाजपा, रामदास यांचा पीएमके, विजयकांत यांचा डीएमडीके, जी. के. वासन यांचा तामिळ मनिला काँग्रेस, के. कृष्णस्वाम यांचा पुतिया तामिझगम व शिक्षणतज्ज्ञ टी. आर. पाचुमुथूयांच्या आयजेके या मित्रपक्षांमध्ये वाटप व्हावे अशी भूमिका अण्णा द्रमुकने घेतली आहे.निर्मला सीतारामन यांची महत्त्वपूर्ण भूमिकातामिळनाडूचे मुख्यमंत्री इडप्पडी के. पलानीस्वामी व मंत्री एस. पी. वेलुमणी, पी. तंगामणी हे युती करण्यासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात आहेत. भाजपा नेत्याने सांगितले की, युतीबाबत अण्णा द्रमुक व भाजपामध्ये प्राथमिक बोलणी झाली आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा फायदा तामिळनाडूमध्ये युतीला विजय मिळण्यास होऊ शकतो असे अण्णाद्रमुकच्या काही नेत्यांचे मत आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू