४ किमी खोदले, अवघे ५०० मीटर राहिलेले! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:04 AM2023-11-13T09:04:46+5:302023-11-13T09:06:50+5:30

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे.

4 km dug, only 500 meters left! efforts to rescue 40 people trapped in Uttarkashi tunnel Uttarakhand | ४ किमी खोदले, अवघे ५०० मीटर राहिलेले! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

४ किमी खोदले, अवघे ५०० मीटर राहिलेले! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये रविवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा ते डंडालगावादरम्यान निर्माणाधीन सुरुंगात भूस्खलन झाले आहे. यामुळे आतमध्ये खोदाईसाठी गेलेले सुमारे ४० कामगार, अधिकारी अडकले आहेत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ठेकेदार आणि प्रशासनाची मोठी खटपट सुरु झाली आहे. 

या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतू, गेल्या ३० तासांहून अधिक काळ हे लोक आतमध्ये अडकलेले असल्याने त्यांना ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी पाईपचा आधार घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस बचाव कार्य करत आहेत. 

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाइपलाइनद्वारे कॉम्प्रेसरद्वारे दाब निर्माण करून रात्री बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हरभऱ्याची पाकिटे पाठवण्यात आली आहेत.

बोगद्यात अडकलेल्या राज्यांमध्ये बिहारमधील 4, उत्तराखंडमधील 2, बंगालमधील 3, यूपीमधील 8, ओरिसातील 5, झारखंडमधील 15, आसाममधील 2 आणि हिमाचल प्रदेशातील एकाचा समावेश आहे. अडकलेल्या लोकांकडून अन्नाची मागणी केली जात आहे. सुमारे साठ मीटर आत ते अडकले आहेत. 

चार धाम रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास २६ किलोमीटरने कमी होणार आहे. हा बोगदा ऑल वेदर रोड प्रकल्पाचा भाग आहे, ज्याची लांबी 4.5 किमी आहे. चार किलोमीटरचा बोगदा बांधण्यात आला आहे. उर्वरीत ५०० मीटरच्या खोदाईचे काम सुरु असतानाच हा प्रकार घडला आहे. 

Web Title: 4 km dug, only 500 meters left! efforts to rescue 40 people trapped in Uttarkashi tunnel Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.