नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर म्हणजे ८ नोव्हेंबरपासून २९ डिसेंबर या काळात बँकांच्या विविध शाखांतील खात्यांत ४ लाख कोटी रुपये इतकी अघोषित रक्कम जमा झाल्याचा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे. ज्यांनी या रकमा भरताना, त्यांचा स्त्रोत दाखविला नाही, त्यांना प्राप्तिकर विभागातर्फे नोटिसा पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. बँकांतील १ लाख १४ हजार खात्यांमध्ये हा अघोषित पैसा जमा झाला, अशी प्राप्तिकर खात्याची माहिती आहे. ही सर्व अघोषित रक्कम करचुकवेगिरीतून निर्माण झालेली आहे, असा प्राप्तिकर खात्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधितांच्या खात्यांमध्ये जमा झालेल्या अवाढव्य रकमा त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांशी जुळवून तपासल्या जाणार आहेत. प्रामाणिक करदाते आपल्या घरात इतक्या मोठ्या रकमा साठवून ठेवत नाहीत, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेहमीपेक्षा बँकेत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा करणाऱ्या सुमारे ५ हजार लोकांना यापूर्वीच प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. केंद्र सरकारने आपल्याकडील रकमा ३१ डिसेंबरपर्यंत जमा करा, असे आवाहन केले होते. त्यामुळे आपल्याकडील रकमा भरल्यास आपल्यावर कारवाई होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र तो गैरसमज आहे. अचानक प्रचंड रकमा जमा करणाऱ्यांची चौकशी होणारच आहे. त्यासाठी आम्ही दर आठवड्याला बँकांकडून मिळणाऱ्या माहितीचे आम्ही विश्लेषण करीत आहोत. ज्यांच्याकडे बेहिशोबी पैसा आहे, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणारच आहे, अशी माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४५00 कोटी रुपये जप्तनोटाबंदी जाहीर झाल्यापासून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची बारीक नजर होती. त्यामुळे ठिकठिकाणी धाडी घालण्यात आल्या. या धाडींमधून तब्बल ४५00 कोटींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. नोटाबंदीजाहीर झाल्यापासून देशभरात एकूण १000 सर्व्हे, तपास मोहिमा आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २२ ते २८ डिसेंबर या काळात प्राप्तिकर विभागाने २00 शोध मोहिमा राबविल्या. ४५८ कोटी रुपये रोख हाती- सर्व्हेमध्ये संबंधित व्यक्तीचे आर्थिक व्यवहार, हिशेबाची कागदपत्रे आणि संपत्तीची छाननी यांचा समावेश असतो, तर तर शोध आणि जप्ती म्हणजे धाडीची कारवाई करण्यात आली.- प्राप्तिकर विभागाला छाप्यात बाद व नव्या नोटा, सोने, हिरे, अन्य महागड्या वस्तू, बेनामी मालमत्ता आढळल्या. त्या सर्व ताब्यात घेतल्या आहेत. कारवाईमध्ये ४५८ कोटी रुपये रोख सापडले. त्यापैकी १0५ कोटी रुपये नव्या नोटांच्या स्वरूपातील आहे, असे सांगण्यात आले. - रोख रक्कम हा काळ्या पैशाचा एक भाग आहे. सोने, महागड्या वस्तू, वाहने, अन्य संपत्ती, मालमत्ता अशा स्वरूपात हा काळा पैसा लपवून ठेवला होता. रकमेखेरीज इतर वस्तुंची छाननी अद्याप करायची आहे. 547बँक शाखांवर होती नजरनोटाबंदी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत प्राप्तिकर विभागाने ५00 प्रकरणे ईडी व सीबीआयकडे पाठवली. बँकांच्या ५४७ शाखांवर प्राप्तिकर विभागाने नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितुनुसार ईडीने १0 बँकांच्या ५0 शाखांची तपासणी केली. नोटाबंदीनंतर बँकांमधील व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसताच, ही कारवाई करण्यात आली.
चार लाख कोटी काळे धन जमा?
By admin | Published: December 31, 2016 1:29 AM