नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 08:31 AM2023-05-25T08:31:52+5:302023-05-25T10:11:33+5:30

सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं. 

4 opposition parties support Modi government for inauguration ceremony of new parliament building Central Vista | नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. मात्र या सोहळ्यावरून बरेच राजकारण रंगत आहे. बहुतांश विरोधी पक्षांनी या वास्तूचे उद्धाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते करावे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही असा सूर काढला आहे. अनेकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. परंतु असेही काही विरोधी पक्ष आहेत जे NDA चे भाग नसतानाही वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

या सोहळ्यासाठी पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजर राहतील. 

YSR काँग्रेसकडून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ट्विट करून सांगितले की, भव्य आणि विशाल संसद भवन राष्ट्राला समर्पित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. संसद हे लोकशाहीचे मंदिर असल्याने आपल्या देशाचं प्रतिबंब करते. ही वास्तू देशातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. अशा वास्तूच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे लोकशाहीच्या भावनेला अनुसरून नसणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं त्यांनी म्हटलं. 

'या' राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कार
आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK).

Web Title: 4 opposition parties support Modi government for inauguration ceremony of new parliament building Central Vista

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.