जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुधवारी शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्या. यात 4 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि लष्काराचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशिद या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर भ्याड हल्ला केला.