शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

प्रत्येक महिलेस देणार प्रतिमहिना ४ हजार रुपये; काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 12:39 PM

विकासासाठी पुन्हा माझ्या हातात सत्ता द्या; केसीआर यांचे जनतेला आवाहन

तेलंगणा / हैदराबाद: काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक महिलेला दर महिना पेन्शन, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सवलत, सरकारी परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास अशा विविध योजनांद्वारे ४ हजार रुपयांपर्यंतचे लाभ देण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी सांगितले की, बीआरएस प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लुटलेला सर्व पैसा जनतेला परत करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांचा सर्वांत मोठा फटका तेलंगणातील महिलांना बसला आहे.

विकासासाठी पुन्हा सत्ता द्या : केसीआर

  • विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर त्यासाठी बीआरएस पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निर्मल येथील प्रचारसभेत सांगितले.
  • २०१४ सालापासून तेलंगणाचा उत्तम विकास झाला आहे. बीआरएसच्या राजवटीत तेलंगणात जातीय दंगली घडल्या नाहीत. संचारबंदीची वेळही आली नाही.
  • काँग्रेस सत्तेवर आल्यास बीआरएसच्या उत्तम योजना ते सरकार बंद पाडेल. बीआरएस तेलंगणात पुन्हा सत्तेवर आली तरच विकासाचा प्रवाह असाच पुढे सुरू राहील.

‘महिलांना सरकारी बसमधून माेफत प्रवास’

  • काँग्रेस सत्तेवर आली तर आम्ही महिलांच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविणार आहोत. तेलंगणात प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यात पेन्शनच्या रूपाने २५०० रुपये जमा केले जातील. 
  • स्वयंपाकाचा गॅस ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येईल. त्यासाठी प्रत्येक महिलेकरिता सरकार एक हजार रुपये खर्च करेल.

कालेश्वरमवरून राहुल गांधींचे टीकास्त्र

राहुल गांधी यांनी कालेश्वरम सिचंन याेजनेच्या मेडिगड्डा बॅरेजची पाहणी केली. त्यानंतर साेशल मीडिया ‘एक्स’वरील पाेस्टमध्ये त्यांनी, कालेश्वरम प्रकल्प म्हणजे केसीआर कुटुंबाचे एटीएम असल्याचा आराेप केला. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावcongressकाँग्रेस