ऑनलाइन लोकमत
बिहार, दि.३ - बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या पेक्षा त्यांच्या मुलाची संपत्ती अधिक असल्याची अधीकृत माहीती आज समोर आली आहे. नीतीश कुमार यांचा मुलगा निशांत याच्याकडे आपल्या वडिलापेक्षा तब्बल ४ पट अधिक संपत्ती असल्याचे समजते आहे.
बिहारच्या मंत्रिमंडळच्या सचिवालय विभागने ३ दिवसापुर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार सोबत राज्यातील अन्य मंत्र्याची गेल्या वर्षापर्यंतची स्थावर आणि अस्थावर मालमत्ता जाहीर केली होती. त्यामध्ये ६४ वर्षीय मुख्यमंत्री नितीश कुमारजवळ रोख आणि बँकमधील एकूण संपत्ती ६० लाख असल्याचं सांगण्यात आले. तर त्यांच्या मुलाकडे म्हणजे निशांतकडे एकूण संपत्ती २.१८ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले.
२२ डिसेंबर रोजी नीतीश कुमारयांच्याद्वारा जारी केलेल्या संम्पत्ति ब्यूरोनुसार त्यांच्याजवळ ६४४००० रुपयांची दायित्व देनदारी आहे तर त्यांच्या मुलाकडे कोणतेही कर्जाचे देणे नाही.
मुख्यमंत्री नितीश कुमार जवळ ४०,५६६ रुपये येवढी रोख रक्कम तर निशांतजवळ ७,०३४ रुपये असल्याच सांगण्यात आले आहे.