शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 15:20 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे.

नवी दिल्ली- 2014 साली प्रत्येक प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे नरेंद्र मोदी आपण सत्तेत येताच दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेऊ असे सांगत असत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची हिंमत होणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झाल्यावरही दहशतवादी हल्ले रोखण्यात आपल्याला फारसं यश आलेलं दिसत नाही. सीमेपलिकडून गोळीबार आणि भारताच्या सीमेत दहशतवादी पाठवण्याच्या घटना तशाच असून जम्मू आणि काश्मीरमध्येही फुटिरतावादी तरुणांनी अनेक घातपाती कारवाया केल्या आहेत.अर्थात या काळामध्ये देशातील सुरक्षा दले शांत बसली आहेत असे नाही पण आपल्या जवानांना प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करावे लागले आहे. 2014 साली निवडणूक प्रचारामध्ये पाकिस्तानला संपुआ सरकारने धडा शिकविण्याऐवजी प्रेमपत्रे पाठवल्यासारखी निषेध खलिते पाठवण्यात धन्यता बाळगली, मी अशी प्रेमपत्रे लिहू शकणार नाही, पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे नरेंद्र मोदी सांगायचे. जर पंतप्रधानांच्या हातामध्ये देशाच्या सीमा, सीआरपीएफ, सर्व सुरक्षा दले,उपग्रह, मोबाइल नेटवर्क, बँका आहेत मग त्यांना दहशतवादी कारवाया थांबवण्यापासून कोण रोखतंय असे मोदी म्हणायचे पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र दहशतवादावर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यांमध्ये वाढच केली असून जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अस्थिरताही निर्माण झाली आहे.डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षामध्ये 2022 दहशतवादी मारले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात 1737 दहशतवादी मारले गेले आहेत. संपुआ सरकारच्या शएवटच्या चार वर्षांमध्ये प्रतीवर्ष 505 दहशतवादी मारले गेले पण भाजपाप्रणित रालोआ2 सरकारमध्ये प्रतीवर्ष 434 दहशतवादी मारले गेले आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 177 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते तर मोदी सरकारच्या काळामध्ये या राज्यात 4 वर्षांमध्ये 263 जवान शहिद झाले आहेत.या काळात या राज्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. तसेच नक्षली हल्ल्यांसारख्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यात मात्र सरकारला यश आल्याने ईशान्य व मध्य भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारल्या जाणाऱ्या जवानांच्या संख्येत घट झाली आहे.2017 साली 860 वेळा, 2016 साली 271 वेळा तसेच 2015 मध्ये 387 आणि 2014मध्ये 405 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाकिस्तानने गोळीबार सुरु केला असून 21 जानेवारीपर्यंत पाकिस्तानने 134 पेक्षा जास्तवेळा शस्त्रशसंधीचे उल्लंघन केले आहे.

बुरहान वाणी गँगचे संपूर्ण उच्चाटनहिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या एकेक कमांडर्सना टिपून मारण्यात मोदी सरकारला यश आले आहे. बुरहान वाणीपासून सुरुवात केल्यावर 10 वरिष्ठ कमांडर्सना मारण्यात भारतीय जवानांना यश आले. यामध्ये सद्दाम पाडर, आदिल खंडे, नासिर पंडित, अश्फाक भट, सब्जार भट, अनिस, इश्फाक डार, वसीम मल्लाह, वसीम शाह यांचा समावेश आहे. बुरहानच्या गँगमधला एकूण एक दहशतवादी मारल्यामुळे मोदी सरकारचे कौतुकही होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीदCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन