बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:58 IST2020-06-02T19:57:55+5:302020-06-02T19:58:45+5:30
घरातील एसीतून थंड हवेऐवजी चक्क सापाची तब्बल 40 पिल्ले बाहेर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट
मेरठ - साप पाहिल्यावर सर्वांचीच घाबरगुंडी उडते. मात्र जर कोणी एसीतून साप बाहेर आल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील एसीतून थंड हवेऐवजी चक्क सापाची तब्बल 40 पिल्ले बाहेर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेरठ जिल्ह्यातील पावली या गावातील एका घरामधील एसीच्या पाईपमधून एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 हून अधिक सापाची पिल्ले बाहेर काढली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावली खुर्दचे रहिवास असलेल्या श्रद्धानंद यांच्या घरी एसी बसवण्यात आला आहे. रात्री घरातील सर्वजण झोपायला खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना बेडवर सापाची काही पिल्ले दिसली. त्यानंतर थोड्यावेळाने एसीच्या पाईपमधून काही पिल्ले बाहेर येताना दिसली. त्यांनी एसी उघडल्यावर तब्बल 40 पिल्ले त्यांना दिसली.
सापाची मोठ्या प्रमाणात पिल्ले सापडल्यामुळे श्रद्धानंद यांच्या घरी लोकांची गर्दी जमा झाली. कुटुंबातील लोकांनी सर्व सापांच्या पिल्लांना सुरक्षित जंगलात सोडून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये अशीच धक्कदायक घटना समोर आली होती. चचाई या गावातील एक घरातून दररोज सापाची 5 ते 25 पिल्ले बाहेर येत असल्याची घटना घडली. आठ दिवसांत सापाची तब्बल 123 पिल्ले बाहेर निघाली होती.
सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणार, देशात पेट्रोल-डिझेल महागणार https://t.co/bpZDwwBHhM#fuelhike#petrolPrice#diesel
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
मध्य प्रदेशच्या चचाई गावात ही घटना घडली होती सापामुळे घरातील सर्वच मंडळी धास्तावले. कुटुंबातील लहान मुलं देखील घाबरून शेजारच्या घरात झोपण्यासाठी जात असे. चचाई गावचे रहिवासी असलेल्या राजकुमार कुशवाहा यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी दररोज सापाची काही पिल्ले बाहेर येत होती. या घरात 12 जणांचे कुटुंब राहते मात्र सापामुळे दहशत निर्माण झाली असून कुटुंबातील काही सदस्य हे रात्रीच्या वेळी गावातील इतर घरांमध्ये झोपायला जात होते.
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पालकांमध्ये भीतीचे वातावरणhttps://t.co/aK2DsghwhG#CoronaVirusUpdate#coronavaccines#childern
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण
धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?
'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल
CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त