स्वाईन फ्लूचे थैमान आणखी ४० मृत्यू
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूचा प्रकोप दिवसागणिक वाढत असून या साथीने गत २४ तासांत आणखी ४० बळी घेतले आहेत़ याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या ७४३ झाली आहे़ महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि तेलंगण राज्यांत या साथीचे प्रमाण जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे़
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूचा प्रकोप दिवसागणिक वाढत असून या साथीने गत २४ तासांत आणखी ४० बळी घेतले आहेत़ याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या ७४३ झाली आहे़ महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि तेलंगण राज्यांत या साथीचे प्रमाण जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे़एच१एन१ विषाणूने यावर्षी आतापर्यंत ७४३ बळी घेतले असून सुमारे १२ हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे़ या स्थितीशी निपटण्यासाठी सरकारने तपासणी किट्स आणि औषधांच्या अतिरिक्त खरेदीचे आदेश दिले आहेत़दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे़पी़ नड्डा यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशात स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेतला़ यावेळी उत्तर प्रदेशला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही त्यांनी दिली़ दिल्लीत १९१७ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे़