शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रोज बांधणार ४0 किलोमीटरचे महामार्ग : नितीन गडकरी

By admin | Published: January 06, 2017 2:33 AM

रोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीरोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे. महाराष्ट्र व राजस्थानात रेल्वे व राज्यांच्या मदतीने २५00 रेल्वे ओव्हरब्रिज (ओआरबी) बांधण्यात येईल आणि नागपूर व वाराणसीमध्ये एकात्मिक वाहतूक केंद्रेही उभारण्यात येत आहेत, अशा घोषणा केंद्रीय भूतल परिवहन राष्ट्रीय मार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केल्या. आपल्या मंत्रालयांच्या अडीच वर्षांच्या कामगिरीची ते माहिती देत होते.

यूपीए काळात रोज ३ किलोमीटर्स महामार्ग बांधले जात होते. या थंडावलेल्या कामाला वेग देत, रोज २२ किलोमीटर्सची रस्ते बांधणी आम्ही सुरू केली. यापुढे रोज ४0 कि.मी. अंतराची महामार्ग उभारणी देशात सुरू झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावा करून गडकरी म्हणाले, ‘१0 एक्स्प्रेसवेना सुरुवात होत असून, काही कामे सुरूही झाली आहेत, एक्स्प्रेसवेमध्ये मुख्यत्वे नागपूर हैद्राबाद बंगळुरू ११00 कि.मी. लांबीच्या, तर मुंबई-बडोदे ४00 कि.मी.इत्यादी १0 आंतरराज्य एक्सप्रेसवेचा समावेश आहे. आतापर्यंत ४ लाख ६0 हजार कोटींची कामे झाली असून, त्यातून १४ हजार ३९0 किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत.

जिल्हा मुख्यालयांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्यासाठी ६0 हजार कोटी रुपये खर्च करून ९ हजार किलोमीटर्सचे रस्ते बांधत आहोत. दोन लाख किमीचे नवे राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे ठरवले आहे. महामार्ग बांधणी प्रकल्पातून २ कोटी लोकांना रोजगार मिळेल व जीडीपीतही २ टक्क्यांची भर पडेल, असा दावा गडकरींनी केला. यापुढे वाहनाला लावलेल्या टॅगमुळे टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. संबंधित टोल नाक्यांवर नोंदीनुसार वाहनमालकाच्या बँक खात्यातून रक्कम कापली जाईल. या तंत्रज्ञानामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला राज्यमंत्री पी. राधाकृष्णन व परिवहन सचिव संजय मित्रा हजर होते.