प्रजासत्ताक दिन 2024 च्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी पहिल्यांदाच 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 12 जनांची निवड करण्यात आली आहे. यात माजी केंद्रीय मंत्री तथा उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्यारेलाल आणि प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते राजदत्त आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या झोळीत सर्वाधिक पद्म भूषण -या वर्षी महाराष्ट्राच्या झोळीत सर्वाधिक पद्म भूषण आले आहेत. राज्यातील सहा विभूतींना भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नागरिक पुरस्कार पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले आहे. तर सहा दिग्गजांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. पद्म पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये माध्यम आणि कलामधून प्रत्येकी दोन, वैद्यकीय श्रेत्रातील तीन आणि उर्वरित इतर श्रेणीतील आहेत.
देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान असतो पद्म पुरस्कार -पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असतो. तो पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री अशा तीन कॅटेगिरींमध्ये दिला जातो. 132 पैकी 5 पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि 110 पद्म श्री पुरस्कार आहेत. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये 30 महिला आहेत. तसेच, 2024 मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित केल्या जाणाऱ्यांमध्ये 8 जर परदेशी आहेत. 9 जणांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येत आहे.
या लोकांना मरणोपरांत मिळतोय पद्म पुरस्कार - बिहारचे बिंदेश्वर पाठक यांना मरणोपरांत पद्म विभूषण, केरळच्या फातिमा बीबी, पश्चिम बंगालचे सत्यब्रत मुखर्जी, लद्दाखचे टी रिनपोचे आणि तामिळनाडूचे विजयकांत यांना मरणोपरांत पद्म भूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे सुरेंद्र मोहन मिश्रा, केरळचे पीसी नंबूद्रीपाद, गुजरातचे हरीश नायक आणि पश्चिम बंगालचे नेपाल चंद्र सूत्रधार यांना मरणोपरांत पद्म श्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे.