हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील गोदावरी नदीत बोट पलटी झाली आहे. या बोटीतून 40 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे.
पूर्व गोदावरी येथे ही दुर्घटन घडली असून एनडीआरएफ जवानांकडून वेगाने मदतकार्य सुरु आहे. या बोटीतून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी नदीतील एका पुलाच्या खांबाला बोट धडकल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर बोटमधील 10 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच गोदावरी नदीत एक नाव पलटी होऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.