मुंबई : हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे. मेडिकल जर्नलच्या अभ्यासानुसार, ४० टक्के भारतीयांना हार्ट फेल्युअरचा धोका आहे.हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर हे दोन वेगळे कार्डिओव्हस्क्युलर विकार आहेत. भारतात ८-१० दशलक्ष लोकांना हार्ट फेल्युअरचा त्रास आहे. भारतात दरवर्षी सुमारे २० लाख जणांना हार्ट अटॅक येत आहे.हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश गौतम यांनी सांगितले की, हार्ट अटॅक ही अचानक होणारी कार्डिअॅक घटना आहे. धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा विकार निर्माण होतो. खाण्याच्या अनारोग्यकारक सवयी, उच्च रक्तदाब, वायुप्रदूषण, उच्च कोलेस्ट्रॉल आणि तंबाखूचे सेवन हे हृदयविषयक आजारांच्या प्रमाणामध्ये वाढ होण्यास प्रमुख कारणीभूत घटक ठरतात.हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापनहार्ट अटॅक येऊन गेलेले रुग्ण डॉक्टरांनी सल्ल्याचे काटेकोर पालन करून हार्ट फेल्युअर टाळू शकतात, नियमित व्यायाम, आरोग्यपूर्ण आहार, धूम्रपान टाळणे, अशा बदलांच्या मदतीने,तसेच मधुमेह, हायपरटेन्शनसारख्या आजारांचे व्यवस्थापन करून हार्ट फेल्युअर टाळता येते.हार्ट अटॅकची लक्षणेहार्ट फेल्युअरच्या लक्षणांमध्ये श्वास लागणे किंवा हृदयाची गती वाढणे. घोटे, पाय व ओटीपोटावर सूज येणे, उंच उशी घेतल्याशिवाय झोपणे कठीण होणे, सतत थकल्यासारखे वाटणे आदींचा समावेश होतो, तर पाठ, मान, हात किंवा जबडा दुखणे, मळमळ होणे, घाम फुटणे ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.हार्ट फेल्युअरचे निदानहार्ट फेल्युअरच्या सुमारे ६० टक्के रुग्णांमध्ये निदानच होत नाही किंवा चुकीचे निदान होते. पम्पिंग कार्यक्षमता व प्रसरण पावलेले हृदय यांच्याबद्दल निदान करण्यात ईसीजीची मदत होऊ शकते. एनटी-प्रोबीपी चाचणी प्रामुख्याने हार्ट फेल्युअरची तीव्रता निश्चित करण्यासाठी, तिचे निदान करण्यासाठी व मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते.जीवनशैलीत बदलासह योग्य आहार घेणे गरजेचेहार्ट फेल्युअर ही वाढत जाणारी अवस्था आहे. पम्पिंगची जबाबदारी असलेले हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर झाल्यामुळे पम्पिंगची कृती अनियमित होते व त्यातून हार्ट फेल्युअर हा विकार होतो. इस्केमिक हृदयविकारांच्या प्रमाणात, तसेच मधुमेह व हायपर टेन्शनसारख्या चिवट अवस्थांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने, हार्ट फेल्युअरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. श्वास लागणे, थकवा, घोटे-पाय-पोटाला आलेली सूज, कारण नसताना वजन वाढणे, तसेच रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे, यासारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यातील कोणतीही समस्या जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेतला पाहिजे. हे प्रकार वयोमानाने होत असावेत, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ही लक्षणे अन्य आजाराशी जोडणे धोक्याचे आहे. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे, शिवाय योग्य आहाराचे सेवन केले पाहिजे.- डॉ. देव पहलजानी, हृदयरोगतज्ज्ञ.
४० टक्के भारतीयांना ‘हार्ट फेल्युअर’चा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:33 AM