नवी दिल्ली : चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय रेल्वेचा प्रवासी भाड्याद्वारे मिळणारा महसूल ४00 कोटी रुपयांनी घसरला असल्याचे दिसून आले आहे. मालवाहतुकीद्वारे मिळणारा मिळणारा महसूल मात्र वाढून २८,000 कोटी रुपयांवर गेला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका अर्जावर ही माहिती भारतीय रेल्वेच्या प्रशासनाने अधिकृतरित्या दिली आहे.दुसºया तिमाहीत रेल्वेचा मालवाहतूक महसूल ३,९0१ कोटी रुपयांनी घसरला होता. त्यात डिसेंबर-आॅक्टोबरच्या तिमाहीत सुधारणा झाली आहे. दुस-या तिमाहीत प्रवासी भाड्याचा महसूलही १५५ कोटी रुपयांनी घसरला होता.मध्यप्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या अर्जावर रेल्वेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, २0१९-२0 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) रेल्वेने प्रवासी भाड्यापोटी १३,३९८.९२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत तो घसरून १३,२४३.८१ कोटी रुपये झाला. आॅक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत तो आणखी घसरून १२,८४४.३७ कोटी रुपये झाला.रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतुकीतील घसरणीवर रेल्वेने अनेक उपाय योजना केल्या होत्या. त्याचा परिणाम चालू वित्त वर्षाच्या तिसºया तिमाहीत दिसून आला आहे. ‘बिझी सिजन’ काळात लावण्यात येणारा अधिभार अलीकडेच रेल्वेने काढून टाकला आहे. वातानुकुलित रेल्वेंच्या प्रवास भाड्यात २५ टक्क्यांपर्यंतची सवलत योजना रेल्वेने सुरू केली आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठीही सवलत लागू करण्यात आली आहे.वाढ, पण घटच- माहिती अधिकार उत्तरात रेल्वेने म्हटले की, तिसºया तिमाहीत मालवाहतुकीत मात्र रेल्वेने चांगली सुधारणा केल्याचे दिसून आले आहे.- पहिल्या तिमाहीत मालवाहतुकीपोटी रेल्वेला २९,0६६.९२ कोटी रुपये मिळाले होते. दुसºया तिमाहीत मालभाड्याचा महसूल घसरून २५,१६५.१३ कोटी रुपयांवर आला. तिसºया तिमाहीत मात्र तो वाढून २८,0३२.८0 कोटी रुपये झाला.- दुसºया तिमाहीच्या तुलनेत तो वाढल्याचे दिसत असले, तरी पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसूल सुमारे एक हजार कोटींनी कमीच आहे.
रेल्वेच्या प्रवासी भाड्याच्या महसुलात ४00 कोटींची घट, मालवाहतुकीत चांगल्या सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:12 AM