शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
3
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
6
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
7
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 
8
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
9
Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव
10
आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
11
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
12
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
13
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
14
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
15
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
16
"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय
17
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
18
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
19
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
20
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट

रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 4:11 AM

भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : सदोष बांधणीमुळे भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. एकनिष्ठ काम आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या २ वर्षांत फार काही बदल झाला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.भारतातील रस्ते अपघाताबाबत २०१५ सालचा अहवाल जारी करताना, केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला ५७ अपघात होतात आणि त्यात १७ जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्यांत ५४ टक्के लोक तरुण म्हणजे १५ ते ३४ वयांतील असतात.’‘हा अहवाल पाहून जनता आमच्यावर टीका करेल, तरीही मी हा अहवाल उघड करीत आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत काम केले, पण त्यातून फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालाने आपणास खूपच वेदना होत आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.अहवाल सादर करताना गडकरी म्हणाले की, ‘मृतांची ही आकडेवारी युद्ध, रोगराई किंवा दहशतवादी कारवायांशी निगडित नाही. केवळ अपघातांतून असे मानवी बळी आम्ही जाऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षांत याबाबत आम्ही प्रधानमंत्री सडक सुरक्षा योजनेसारख्या उपाययोजना राबविल्या. त्यात रस्त्याच्या बांधणीवर करण्यात येणाऱ्या एकूण खर्चापैकी एक रक्कम सुरक्षेवर खर्च करण्यात येते. ही रक्कम पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास जाते.’या प्रकाराबद्दल त्यांनी यूपीए सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘यूपीएच्या राजवटीत प्रचंड पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले. दिल्ली-गुडगाव पट्ट्यासह महत्त्वाच्या मार्गांवर ही कामे करण्यात आली. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)>2015 मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी ७७.१२ टक्के अपघातांना ‘चालकाची चूक’ कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्ते अपघातातील हेच प्रमुख ‘सदोष अभियांत्रिकी’ कारण असल्याचे म्हटले आहे.