- बलवंत तक्षक चंदीगड : लॉकडाऊनच्या काळात पंजाब विद्यापीठाच्या जैव-भौतिकी प्रयोगशाळेत खाण्यापिण्यास न मिळाल्याने ४०० उंदरांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरस उद्रेकाच्या काळात चंदीगडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे उंदरांना खाऊ-पिऊ घालणारा कर्मचारी विद्यापीठात पोहोचू न शकल्याने या उंदरांचा मृत्यू झाला.
पंजाब विद्यापीठातील प्रयोगशाळेत विविध प्रयोगांसाठी उंदरांचा वापर केला जातो. सध्या २५ संशोधकांचे संशोधन जैव-भौतिकी विभागात सुरू आहे. एम.एस्सी.चे विद्यार्थीही येथे संशोधन करतात. हे सर्व संशोधन मानवी आजार, निदान व उपचाराशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेत बहुतांश प्रयोग प्राण्यांवर केले जातात.
या विभागातील प्राण्यांना खाऊ-पिऊ घालण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची किंवा संशोधकाची असते. निश्चित केलेले खाणे या प्राण्यांना दिले जाते; परंतु कोरोनाच्या काळातील संचारबंदीमुळे उंदरांना खाऊ-पिऊ खालणारा कर्मचारी विद्यापीठात जाऊ शकला नाही. लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा कर्मचारी विद्यापीठात गेला. तेव्हा त्याने पाहिले तर ४०० उंदरांचा मृत्यू झालाहोता.