शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

चंद्रावर पोहोचायला ४२ दिवस, सूर्यापर्यंत जायला किती वेळ लागेल, नेमकं अंतर किती?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 4:36 PM

Aditya-L1 Launch Date: सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.

नवी दिल्ली: चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. इस्रो २ सप्टेंबर रोजी सूर्य मोहीम लॉन्चिंग करणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती इस्रोने दिली असून आदित्य-L1 चे प्रक्षेपण २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून ११.५० वाजता होणार आहे. खरं तर सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.

आदित्य-L1 मिशन हे सूर्याचे तापमान, सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, विशेषतः ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता यांचा अभ्यास करणार आहे. बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयातून याचे प्रक्षेपण केले जाईल. ISRO दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य-L1 लॉन्च करेल. 

चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचायला ४२ दिवस लागले. तर आदित्य-L1 सूर्याभोवती पोहचण्यासाठी साधारण ४ महिने लागणार आहे. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी आदित्य-L1 पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर असलेल्या लॅन्ग्रेस पॉइंट म्हणजेच L-1 या विशेष ठिकाणी पोहोचेल. या मोहिमेद्वारे हवामान आणि सौर क्रियाकलापांचा पृथ्वीवर होणारा परिणाम कळणार आहे. माहितीनुसार, आदित्य L1 फोटोस्फियर (म्हणजेच सूर्याचा जो भाग आपण पाहतो तो), क्रोमोस्फियर (फोटोस्फियरचा वरचा भाग) आणि कोरोना, म्हणजेच सूर्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या बाह्य स्तराचा अभ्यास करणार आहे. 

ताऱ्यांच्या अभ्यासात सर्वाधिक मदत होणार-

इस्रोच्या मते, सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. तार्‍यांच्या अभ्यासात हे आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकतो. यातून मिळालेल्या माहितीमुळे इतर तारे, आपली आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील अनेक रहस्ये आणि नियम समजण्यास मदत होईल. सूर्य आपल्या पृथ्वीपासून सुमारे १५ कोटी किलोमीटर दूर आहे. 

सात उपकरणे बसवण्यात येणार-

  • दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (बंगळुरू) द्वारे तयार केले गेले. त्यात सूर्याच्या कोरोना आणि उत्सर्जनातील बदलांचा अभ्यास केला जाईल.
  • सोलर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप: इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (पुणे) द्वारे विकसित करण्यात आले आहे. ते सूर्यप्रकाशातील छायाचित्रे आणि क्रोमोस्फियरची छायाचित्रे घेईल. ही जवळपास अतिनील श्रेणीतील चित्रे असतील, हा प्रकाश जवळजवळ अदृश्य असतो.
  • SOLEX आणि HEL1OS: सौर कमी-ऊर्जा आणि एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (SOLEX) आणि उच्च-ऊर्जा L1 ऑर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (HEL1OS) बेंगळुरू येथील UR राव उपग्रह केंद्राने बांधले होते. सूर्याच्या एक्स रेचा अभ्यास हे त्याचे कार्य आहे.
  • एसपेक्स और पापा: भौतिक संशोधन प्रयोगशाळा (अहमदाबाद) द्वारे आदित्य सौर पवन प्रयोग (Aspex) आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा विक्रम साराभाई स्पेस सेंटर (तिरुवनंतपुरम) यांनी आदित्य (पापा) साठी प्लाझ्मा विश्लेषक पॅकेज तयार केले आहे. सौर वाऱ्याचा अभ्यास करणे आणि ऊर्जेचे वितरण समजून घेणे हे त्यांचे काम आहे.
  • मॅग्नेटोमीटर (मॅग): इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्स प्रयोगशाळा (बंगलोर) द्वारे बनविलेले. हे L1 कक्षाभोवती आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.
टॅग्स :isroइस्रोIndiaभारत