शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले

By admin | Published: June 25, 2017 12:56 AM

रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले.

श्रीनगर : रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले. गोळीबार व हिंसाचारात मरण पावलेल्या ४२ जणांत २७ दहशतवादी आणि ६ नागरिक आहेत. श्रीनगरचे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांनाही जमावाने ठेचून मारले.पंडित यांना ज्या प्रकारे मारण्यात आले, त्यामुळे पोलीस संतापले आहेत. सरकार नीट स्थिती हाताळत नाही आणि बळी आम्हाला पडावे लागते, अशी तक्रार पोलीस करीत आहेत. पंडित यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज तीन जणांना अटक केल्याने एकूण पाच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलीस आणखी आठ जणांचा शोध घेत आहेत. हा प्रकार घडला, तेव्हा हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज फारूख मशिदीत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला पोलिसांनी जम्मूतून अटक करून श्रीनगरला नेले.फुटीरवादी नेते चिथावणीखोर भाषा करून तणाव वाढवत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी द्यायला हव्यात. कारवाईसाठी त्या पुढाकार घेत नाहीत, असे पोलिसांना वाटते. पंडित यांच्या हत्येनंतर श्रीनगरचे पोलीस अधीक्षक सज्जाद खालिक भट्ट यांची बदली झाली. त्यांच्यावर कारवाई होते, पण चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई होत नाही, अशी तक्रार आहे.फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था बंद करावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी तसे सूचितच केले आहे. हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज उमर फारुख याची सुरक्षा काढून घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसे प्रत्यक्षात होणार का, राज्य सरकार तो निर्णय घेणार का, हा प्रश्न आहे. सततच्या हिंसाचार व तणावामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसायही डबघाईला आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यापारी व उद्योजक तसेच हॉटेलमालक, गाइड, छोटे दुकानदार आणि टूर्स व ट्रॅव्हल्सवाले या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. आमच्या रोजगारावरच आता गदा आली आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर आम्हाला अन्यत्र जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. एरवीही पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक दुकानदार आता अन्य राज्यांमध्ये व्यवसायासाठी निघून गेले आहेत.