पाटणा : बिहारमध्ये विषारी दारू पिण्यात आल्यामुळे गेल्या एक महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे सरकारच्या दारूबंदी कायद्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर कोंडी झालेल्या सरकारच्या संरक्षणासाठी पोलीस कारवाई करीत आहेत. ३००१ गुन्हे दाखल झाले तर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ४२०५ दारूतस्करांना अटक झालीबेतिया, गोपालगंज, मुजफ्फरपूर, समस्तीपूरसह अनेक जिल्ह्यांत सरकारी कर्मचाऱ्यांसह गावांत सामान्य लोकांची दारू पिल्यानंतर प्रकृती बिघडली व मृत्यू झाले.
३ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या विशेष छापेमारीत एकूण ३००१ गुन्हे दाखल केले गेले. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ४२०५ दारूतस्करांना अटक झाली. ५८०८९ लिटर देशी आणि ५०,४०० लिटर विदेशी दारू जप्त केली गेली. याच कालावधीत १८,५६२ लिटर देशी आणि ५८,८६१ लिटर विदेशी दारू नष्ट केली गेली. ३२९ दुचाकी, १०४ तीन व चारचाकी वाहनांसह अनेक वाहने जप्त झाली.