ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. २१ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. 62 जागांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ४२.९९ टक्के मतदान झाले. यामध्ये कोलकातामधील सात मतदारसंघांचा समावेश आहे. 418 उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. यामध्ये 34 महिला उमेदवारांचादेखील समावेश आहे. 1 कोटी 37 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
मुर्शीदाबाद, नादिया, बर्दवान आणि उत्तर कोलकातामधील मतदारसंघांमधील 62 जागांसाठी तिस-या टप्प्यातील मतदान होत आहे. सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे. मतदारांना आज कडक उन्हामध्ये मतदानासाठी बाहेर पडाव लागणार आहे. कोलकातामध्ये 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोद करण्यात आली आहे.
महत्वाच्या उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे शशी पांजा, सधन पांडे, भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा, काँग्रेसचे पाच वेळा आमदार राहिलेले मोहम्मद सोहराब, सीपीआयएमचे अनिसूर रहमान आणि निवृत्त आयपीएस अधिकारी नजरुल इस्लाम यांचा समावेश आहे.
A differently abled person arrives to cast his vote in North Kolkata's St.Paul's Cathedral College #westbengalpollspic.twitter.com/pPbpVDSmno— ANI (@ANI_news) April 21, 2016
People in large numbers outside a polling booth in Murshidabad for voting in the third phase of West Bengal election pic.twitter.com/8GiHmnEdOP— ANI (@ANI_news) April 21, 2016