राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४४ व पंचायत समितीसाठी ७१ अर्ज दाखल
By admin | Published: February 06, 2017 2:50 PM
राधानगरी : राधानगरी तालुक्यात रविवारी जिल्हा परिषदेसाठी ११ उमेदवारांनी १७ व पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. आजअखेर अनुक्रमे ४४ व ७१ अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी विद्यमान सभापती सुप्रिया साळोखे यांनी अपक्ष म्हणून, माजी सभापती वंदना जाधव यांनी शिवसेनेमधून जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरला. काँग्रेसच्या कल्पना मोरे, विश्वास राऊत, अंबिका तहशीलदार यांनी पंचायत समितीसाठी अर्ज भरले.
राधानगरी : राधानगरी तालुक्यात रविवारी जिल्हा परिषदेसाठी ११ उमेदवारांनी १७ व पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. आजअखेर अनुक्रमे ४४ व ७१ अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी विद्यमान सभापती सुप्रिया साळोखे यांनी अपक्ष म्हणून, माजी सभापती वंदना जाधव यांनी शिवसेनेमधून जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरला. काँग्रेसच्या कल्पना मोरे, विश्वास राऊत, अंबिका तहशीलदार यांनी पंचायत समितीसाठी अर्ज भरले. जिल्हा परिषदेसाठी रविवारी दाखल झालेले अर्ज याप्रमाणे : राशिवडे-पवन एकनाथ मोळे -शिवसेना, शिवाजी गोपाळ भाट-राष्ट्रवादी. कौलव-प्रकाश सुभाष कलिकते-राष्ट्रवादी, सुनील शिवाजी चौगले-काँग्रेस, बाजीराव यशवंत टिपुगडे -काँग्रेस. कसबा वाळवे-रश्मीन नईम अत्तार-राष्ट्रवादी, वंदना अरुण जाधव-शिवसेना, शीला अनिल पाटील-शिवसेना, सरवडे-दीपाली संदीप खोराटे-जनता दल, आक्काताई सीताराम खाडे-भाजप, राधानगरी-सुप्रिया सुधाकर साळोखे-अपक्ष. पंचायत समिती राशिवडे-अर्जुना दत्तात्रय लाड, संतोष भाऊ पाटील, शिवाजी गोपाळ भाट. कसबा तारळे-वृषाली जोतिराम कलिकते, संगीता संभाजी सायेकर. राधानगरी-नारायण नामदेव कांबळे, दिलीप हरी कांबळे, रामदास दत्तात्रय पोवार. कसबा वाळवे-स्वप्निला कपिलदेव फराकटे, संगीता प्रभाकर पाटील, शुभदा अशोक खोत. कौलव-बळवंत शामराव बरगे, दशरथ सदाशिव भिवसेकर. सोळांकुर-रामचंद्र दादोबा काशीद, विनायक शंकर शिंदे, यशवंत मारुती सुतार. धामोड-वंदना विलास हळदे,अस्मिता शशिकांत खडके. फेजिवडे-विश्वास श्रीपती राऊत, कृष्णात पांडुरंग अरबुने, चाँदसो इमाम तांबोळी. तुरंबे-संगीता शांताराम तौंदकर, अंबिका विष्णू तहशीलदार. सरवडे-कल्पना राजेंद्र मोरे. (प्रतिनिधी)