शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उद्योगजगताकडून ४.५ लाख कोटी रूपये

By admin | Published: July 02, 2015 3:24 AM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया प्रकल्पाची आज घोषणा केली असून, भारतीय उद्योगजगतातील अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया प्रकल्पाची आज घोषणा केली असून, भारतीय उद्योगजगतातील अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर असल्याचे आश्वासन दिले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी डिजिटल इंडिया अत्यंत यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील युवा पिढी तंत्रज्ञान हाताळणार आहे. डिजिटल इंडियाच्या उभारणीसाठी रिलायन्स २ लाख ५० हजार कोटी रु.ची गुंतवणूक करणार आहे अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स जिओ या इंटरनेट सेवा कंपनीसंदर्भात ही घोषणा करताना मुकेश अंबानी म्हणाले, भारतीय नागरिकांना परवडतील असे स्मार्टफोन व उपकरणे रिलायन्स जिओकडून तयार केली जातील. बिर्ला कंपनीचे ७ अब्ज डॉलर येत्या ५ वर्षांत पायाभूत योजना परस्परांना जोडण्यासाठी आदित्य बिर्ला कंपनी ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करील अशी घोषणा आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम यांनी केली. आदित्य बिर्ला कंपनीतर्फे मोबाईल वॅलेटही तयार केले जाणार आहेत. याच प्रमाणे वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी कंपनीतर्फे येत्या ५ वर्षांत १०० हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. ४ जी सर्वसाामन्य नागरिकापर्यंत नेऊ असे त्यांनी सांगितले. टाटा समूह आयटी क्षेत्रात १९८५पासून सक्रिय. टीसीएस यावर्षी ६० हजार कर्मचाऱ्यांची भरती करीत कामाचा विस्तार करणार. आदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर या कंपनीने आतापर्यंत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. येत्या काही वर्षांत ७ अब्ज डॉलर गुंतवणुकीची योजना. भारती एन्टरप्रायझेस ही सुनील भारती यांची कंपनी ४ जी सोबत ई- हेल्थ आणि ई-शिक्षण योजनेत मोठी गुंतवणूक करीत आहे. अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह देशातील सर्वात मोठा आॅप्टिकल फायबर निर्माता आहे. इलेक्ट्रॉनिक फॅब एलसीडीच्या निर्मितीत ४० हजार कोटींची गुंतवणूक करणार. ५० हजार लोकांना रोजगार.हरीओम राय यांच्या लाव्हा इंटरनॅशनलने एक लाख लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अझीम प्रेमजी यांचा विप्रो समूह सरकारच्या मिशनमध्ये गुंतवणूक वाढविणार.पवन मुंजाल यांचा हिरो मोटोकॉर्प आता नव्या क्षेत्रात उतरत इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणार. मिकिओ कायायामा यांचा नायडेक कॉर्पोरेशन येत्या १० वर्षांत १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार. २५ हजार लोकांना रोजगार.टाटा ग्रुप : डिजिटल इंडियातील टाटा ग्रुपच्या सहभागाबद्दल बोलताना टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री म्हणाले, डिजिटल इंडिया या योजनेसाठी आधी भारत सरकारचे अभिनंदन, टाटा समूह यात संपूर्णपणे सहभागी होईल. टाटा ग्रुपची कंपनी टीसीएस सरकारच्या पासपोर्ट सेवा व इतर योजनांत आधीपासून सहभागी असून दुर्गम भागापर्यंत या योजना पोहोचवण्याचे काम करीत आहे.