शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

देशात ४५ लाख टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 1:05 PM

राज्यात अवघे साडेसात लाख टन साखरेचे उत्पादन

ठळक मुद्दे गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर बसला फटका साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा

पुणे : देशातील ४०६ साखर कारखाने १५ डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, ४५.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली असून, एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन येथे झाले आहे. महाराष्ट्रात अवघे ७.६६ लाख टन साखर उत्पादन झाले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ३० टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.यंदाच्या साखर हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के साखर उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात देशभरातील ४७३ साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातून ७०.५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील ११९ साखर कारखान्यांनी २१.२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये येथील ११६ कारखान्यांनी १८.९४ लाख टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी २.३१ लाख टन साखर अधिक उत्पादित केली आहे. देशात साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेरीस ७.६६ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी याच काळात राज्यातील १७८ कारखाने सुरू होते. त्यांनी २९ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातही १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ महिना, तर कर्नाटकातील गाळप हंगाम एका आठवड्याने उशिरा सुरू झाला. पावसामुळे बाधित झालेल्या उसाचा साखर उतारादेखील कमी असल्याने, उत्पादनात घट नोंदविण्यात आली. गुजरातमध्ये १.५२ लाख टन, आंध्रप्रदेश, तेलंगणामधे ०.३०, तमिळनाडूत ०.७३, बिहार १.३५, पंजाब ०.७५, हरयाणा ०.६५ आणि मध्य प्रदेशमध्ये ०.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे. ........साखर कारखाने करणार १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठादेशातील साखर कारखाने, डिस्टिलरी युनिट डिसेंबर २०१९ ते नोव्हेबंर २०२० या कालावधीत १६३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहेत. त्यातील १०.३८ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून आणि ६२.५८ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस पासून बनविण्यात येणार आहे. तर, ८६.३९ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती सी हेवी मोलॉॅसिसमधून आणि ३.७८ कोटी लिटर खराब अन्नधान्यातून होणार आहे. म्हणजेच यातील ७३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती थेट उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसमधून होईल. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार