नवी दिल्ली : जागतिक पातळीवर सौरऊर्जेच्या क्षेत्रात या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ४.६ अब्ज डॉलरचा निधी आला. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतील गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे. मेरकॉम कॅपिटल ग्रुपने म्हटले आहे की, व्हेंचर कॅपिटल फंडिंग, पब्लिक मार्केट आणि कर्जातून उभे राहिलेले भांडवल धरून एकूण कंपन्यांचा निधी हा पहिल्या सहामाहीत ४.६ अब्ज डॉलर आहे. जानेवारी ते जून २०१६ कालावधीसाठी हाच निधी ४.५ अब्ज अमेरिकन डॉलर होता. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत सौरऊर्जेच्या क्षेत्रात ९७ व्यवहार झाले ते गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत ७९ होते. सौरऊर्जेच्या क्षेत्रात व्हेंचर कॅपिटल निधी या सहामाहीत ४५ व्यवहारांत ७१३ दशलक्ष डॉलरचा होता.
सौरऊर्जा क्षेत्रात जगात ४.६ अब्ज डॉलरचा निधी
By admin | Published: July 16, 2017 11:49 PM