मध्य प्रदेशातील एका विद्यापीठात एमएचे शिक्षण घेणाऱ्या प्रमोद दंडोतिया या विद्यार्थ्याला आयकर विभागाने १, २ नव्हे तर ४६ कोटी रुपयांची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याची झोप उडाली आहे. मी सध्या बेरोजगार असून ४६ कोटी रुपयांचा व्यवहार कसा करू शकतो ?, असे त्याने म्हटले आहे. नोटीस मिळाल्यानंतर विद्यार्थी परीक्षेच्या काळात आयकर कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. फी भरण्यासाठी आतापर्यंत त्याने पॅन कार्डचा वापर केला आहे. या पॅन कार्डचा कोणीतरी दुरुपयोग केला असल्याची शक्यता आहे, असे प्रमोद याने म्हटले आहे. नोटीस आल्यानंतर अधिकाऱ्यांना भेटत असला तरी त्याला कोणीही मदत केलेली नाही.
बेरोजगार तरुणाला आली ४६ कोटींची आयकर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:35 IST