जिल्ह्यात ४६ टक्के युवा मतदार राष्ट्रीय मतदार दिन विशेष : स्त्री-पुरुष मतदाराचा दर ८९५ पर्यंत
By admin | Published: January 24, 2016 10:19 PM
विलास बारी
विलास बारीजळगाव : मतदान आणि मतदार नोंदणीबाबत करण्यात येणार्या जनजागृतीचा परिणाम म्हणून भारत प्रबळ लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपास येत आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लाख ५५ हजार मतदारांपैकी तब्बल ४६.४७ टक्के मतदार हे युवा मतदार आहेत. जिल्ह्याचा स्त्री-पुरुष मतदाराची नोंदणी देखील ८९५ पर्यंत पोहचली आहे.२५ जानेवारी १९५० हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या निमित्त २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असतो. प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. नागरिकांनी मतदान नोंदणी करावी आणि मतदान करावे, असा प्रशासनाचा मानस आहे. मतदान नोंदणी करण्यासाठी नागरिकांना आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांच्या राहत्या घराजवळील मतदान केंद्रातच नावनोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रत्येक मतदान केंद्रात एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, प्राथमिक शिक्षक हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी जाहीर केलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार संबधित केंद्रस्तरीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांकडून मतदान नोंदणी अर्ज पुराव्यासह प्राप्त करून कार्यालयात जमा करतात.अर्जाची छाननी करून प्राप्त अर्ज मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी पाठविले जातात. मतदार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या भागाची प्रारुप मतदार यादी त्या मतदान केंद्रात प्रसिद्ध केली जाते. २०१५ मध्ये देशभरात मतदार याद्याचे अद्ययावतीकरणाची मोहिम राबविण्यात आली. वर्षभरातील निरंतर प्रक्रिया आणि ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली. ग्राफ करावाजिल्ह्यातील वयोगटानुसार मतदारांची संख्याविधानसभा क्षेत्र१८ ते २०२१ ते २९३० ते ३९चोपडा५२१०६००४७६५८५१रावेर३६११५२८३७६५३६९भुसावळ४०६६५३२७३६५७९३जळगाव (शहर)३९९५७१६६१८६९०८जळगाव (ग्रामीण)४१८४५७६१३७०१५१अमळनेर३९३६५१५६८६९३५०एरंडोल३६३२४९९००६६११९चाळीसगाव४९७०६३०४१८२७१५पाचोरा४८५०५८४८१७३५४४जामनेर४७३४५९६६१६९५५०मुक्ताईनगर४२०२५६५७६६२८९१एकूण४७३९०६३४६५८७७८२४१टक्केवारी १.५०२०.११२४.६६