शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचा नशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, शेतकºयांना दिलेली आश्वासने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकार असंवेदनशील बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर नौकाविहार करण्यात मग्न आहेत तर दुसºया बाजूला शेतकरी आपली दुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला सोमवारी ८८ वर्षे पूर्ण होत असतानाच शेतकºयाला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १८० किलोमीटर चालत सरकारच्या दारी जावे लागते, हे दुर्दैवी आहे.काँग्रेसने म्हटले आहे की, एक जानेवारी २०१७पर्यंत महाराष्ट्रामध्ये २,४१४ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. इतकी भीषण स्थिती असूनही मोदी व अरुण जेटली यांनी शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतमालाची निर्यात घटली व आयात वाढली आहे. मोदी सरकार शेतकºयांऐवजी दलालांची मदत करीत आहे. २०१३-१४या वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात तेव्हा निर्यातीतून ४२.२३ अब्ज डॉलर व आयातीतून १५.०३ अब्ज डॉलरची उलाढाल होत होती. २०१६-१७या कालावधीत निर्यातीतून ३३.८२ अब्ज डॉलर व आयातीतून २५.०९ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. डाळ व गव्हाच्या व्यापाºयांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकारने इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आणली. या कृतीतून मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते.>शेतकºयांच्या स्थितीवर अहवालशेतकºयांचे न सुटलेले प्रश्न व त्याबाबत मोदी सरकारने दाखविलेली निष्क्रिय्रता हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे बनविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत आहे. शेतकºयांच्या स्थितीबद्दल येत्या १६ मार्चपासून सुरू होणाºया काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिवेशनात खास चर्चा करण्यात येईल व त्याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे, सत्तेत आल्यानंतर शेतकºयांसाठी काँग्रेस पक्ष काय करणार आहे, याबाबत अहवालात माहिती देण्यात येईल.