श्रीनगर : बांदिपोरा जिल्ह्यात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून, त्यांचा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
बांदिपोरामध्ये चिमुरड्या मुलीवर ९ मे रोजी बलात्कार झाल्याचे उघड झाल्यापासून उत्तर काश्मीरमध्ये प्रचंड संताप आहे. लोक रोजच्या रोज घराबाहेर येऊ न निदर्शने करीत आहेत, तसेच खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महामार्गावर पट्टण गावापाशी सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. संतापलेल्या जमावाने त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीमार केली. त्यात सात जण जखमी झाले आहेत.
बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण काश्मीर खोºयामध्ये संताप आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो सज्ञान नसल्याचे सांगण्यात येत होते, पण वैद्यकीय चाचणीत तो सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो अल्पवयीन असल्याचे प्रमाणपत्र देणाºया संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याच संतापातून पट्टण येथील जमावाने दगडफेक केल्याचे सांगण्यात आले, पण खो-यामधील काही अतिरेकी गट या दगडफेकीस कारणीभूत असावेत, असा गुप्तचर संस्थांचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)फासावर लटकवा जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालसत्यपाल मलिक यांनी या बलात्कार प्रकरणाचा निषेध करताना लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपीला लवकर शिक्षा व्हावी, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. मात्र, शरियत कायद्यानुसार आरोपीला फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी काही जण करीत आहेत.