शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 8:32 AM

ऑनलाईन सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अव्वल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अद्याप कायम असल्याचं एका ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आलं आहे. देशातील 712 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 48 टक्के जनतेनं मोदींना कौल दिला आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगती करेल, असं जवळपास निम्म्या लोकांना वाटतं. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 57 लाख लोकांनी त्यांची मतं नोंदवली.नॅशनल एजेंडा फोरमच्या अंतर्गत इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीनं (आय-पॅक) केलेल्या सर्वेक्षणात 923 नेत्यांचे पर्याय देण्यात आले होते. यामध्ये मोदींना 48 टक्के जनतेनं पसंती दिली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 11 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (9.3 टक्के), उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (7 टक्के), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (4.2 टक्के), बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती (4.1 टक्के) यांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांचे पर्याय देण्यात आले होते. देशासमोरील प्रमुख समस्या कोणत्या, याबद्दलही लोकांना सर्वेक्षणातून विचारणा करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक असमानता, आरोग्य सेवांचा दर्जा या देशासमोरील मोठ्या समस्या असल्याचं मत नोंदवलं. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजकारणात यायला हवं, असं मत नोंदवणाऱ्याचं प्रमाणदेखील लक्षणीय होतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान