"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी तेव्हा...", आणीबाणीवरून गंभीरचं कॉंग्रेसवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 05:11 PM2023-06-25T17:11:31+5:302023-06-25T17:12:01+5:30
भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
नवी दिल्ली : भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेचा दाखला देत सत्ताधारी भाजप कॉंग्रेसवर टीका करत आहे. या निमित्ताने भाजपाने निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात कधीच आणीबाणी विस्मरणात जाणार नाही, अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने देखील कॉंग्रेसला लक्ष्य केले.
"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी जनतेला गुलाम बनवण्यासाठी तेव्हा संविधानाचा दुरुपयोग केला", अशा शब्दांत गौतम गंभीरने कॉंग्रेसवर निशाणा साधला.
When constitution was misused to makes slaves of people by those who today talk about freedom! #DarkDaysOfEmergency
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 25, 2023
मोदींकडून आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना श्रद्धांजली
ज्या लोकांनी देशात लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम करत आणीबाणीला विरोध केला, त्या लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय काळ आहे, जो पूर्णपणे संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
I pay homage to all those courageous people who resisted the Emergency and worked to strengthen our democratic spirit. The #DarkDaysOfEmergency remain an unforgettable period in our history, totally opposite to the values our Constitution celebrates.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2023
दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंदिरा गांधींचे नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका करणारे ट्विट केले आहे. २५ जून १९७५ रोजी एका कुटुंबाने आपल्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशातील महान लोकशाहीची हत्या केली आणि आणीबाणीसारखा कलंक लावला. ज्यांच्या निर्दयतेने शेकडो वर्षांच्या परकीय राजवटीलाही मागे टाकले. अशा कठीण काळात अपार यातना सहन करून लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी नमन करतो, असे नड्डा म्हणाले.