शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

जि.प.शाळांमध्ये शिक्षकांची ४८३ पदे रिक्त

By admin | Published: July 23, 2016 12:02 AM

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
ही पदे रिक्त असल्याने यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून २०० शिक्षक इतर जिल्ह्यांमधून घेण्यात आले. परंतु यापैकी १०० शिक्षकदेखील अजून रूजू झालेले नाहीत. अलीकडेच मुक्ताईनगर तालुक्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून नियुक्त केलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

आजी माजी सभापतींच्या भागातील शाळांना ठोकले कुलूप
जि.प.शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांच्या गावानजीकच्या मोरझिरा या उर्दू जि.प.शाळेला शिक्षक नसल्याने कुलूप ठोकण्यात आले. यापूर्वी माजी शिक्षण सभापती व जि.प.सदस्य हर्षल पाटील यांच्या सातोद गावानजीकच्या कोळवद शाळेत एक शिक्षक येत नसल्याने कुलूप ठोकले होते.
उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर, चोपडा व जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री व माजी महसूलमंत्री यांना पत्र दिले आहे.
मध्य प्रदेेशच्या सिमेलगतच्या जि.प.च्या शाळांमध्ये शिकविण्यासाठी जायला शिक्षक तयार नाहीत.
जि.प.शाळांची स्थिती
शाळांची संख्या- १८४३
शिक्षकांची संख्या सात हजार ११३
रिक्त शिक्षकांची संख्या- मराठी शाळा- २६१
उर्दू शाळा- २२२

अलीकडेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम महसूल विभागातर्फे राबविण्यात आली. त्यात अनेक शाळांमध्ये पोषण आहार, गणवेश वाटप न करणे व शिक्षक नसणे असे प्रकार आढळले आहेत. या तपासणीमुळे जि.प.च्या गुणवत्ता विकासाचा दावा फोल ठरतो. हेदेखील स्पष्ट झाले आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनातर्फे केली जाईल. आपल्याकडून त्याबाबत शासनाला माहिती सादर केली जाते. भरतीचा अधिकार शासनाचा आहे.
-आस्तिककुमार पांडेय, सीईओ, जि.प.

जिल्हा परिषदेच्या उर्दू आणि मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. काही ठिकाणी पटसंख्या कमी असली तरी अनेक शाळांध्ये स्थिती चांगली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री आदींना पत्र दिले आहे.
-सुरेश धनके, सभापती, जि.प. शिक्षण समिती