तिवरांसाठी ५ कोटी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
तिवरांसाठी ५ कोटी
तिवरांसाठी ५ कोटीमुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील तिवरांची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच येथील तिवरांच्या संवर्धनासाठी महापालिकेने चक्क ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या २०१५-१६ या वर्षीच्या सादर झालेल्या २४२ कोटी ७२ लाख ८२ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पादरम्यान ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परिणामी आता तरी तिवरांचे संवर्धन होण्यासाठी महापालिका सकारात्मक हातभार लावेल, असा आशावाद पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.कुलाबा, शिवडी, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल आणि पश्चिम उपनगरातील खाडयांच्या किनारी मोठया प्रमाणावर तिवरांची झाडे आहेत. शिवाय पूर्व उपनगरातदेखील भांडूप पूर्वेला तिवरांचे जंगल मोठया प्रमाणावर आहे. मात्र तिवरांची दिवसाढवळ्या कत्तल होत असून, याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय खाडीलगतच्या जागा बुजवून तेथे अनधिकृतरित्या झोपडया उभारल्या जात आहेत. परंतू झोपडीदादांना राजकीय वरदस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.परिणामी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने तिवरांच्या संवर्धनासाठी केलेली ५ कोटींची तरतूद उल्लेखनीय असली तरी या माध्यमातून तिवरे वाचली आणि जगली पाहिजेत; असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)................................