पाच मुली झाल्या, पण 'विकास' जन्मलाच नाही; काँग्रेस नेत्याच्या ट्विटनं वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:13 PM2020-06-25T14:13:59+5:302020-06-25T14:15:11+5:30
काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या ट्विटमुळे वाद; स्पष्टीकरण देण्याची वेळ
भोपाळ: पंतप्रधान मोदींनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी आणलेल्या योजनांची तुलना मुलींच्या जन्माशी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'विकास' जन्माला यावा म्हणून मोदींनी इतर योजना आणि निर्णय देशावर लादले, असं मध्य प्रदेशचे माजी मंत्री जितू पटवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'मोदींनी नोटबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आणि मंदी आणून देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली. विकासाची आशा बाळगून जनता हे सगळं सहन करत होती,' असं म्हणत पटवारी यांनी मोदींवर निशाणा साधला. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार असताना पटवारी शिक्षण मंत्री होते. याशिवाय सध्या ते पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत. मध्य प्रदेशच्या विधानसभेत ते राऊ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
मोदी जी ने नोटबंदी, जीएसटी, महंगाई, बेरोज़गारी और मंदी से देश की अर्थव्यवस्था की कमर तोड़ दी..!
— Jitu Patwari (@jitupatwari) June 24, 2020
—जनता यह सब केवल “विकास” की उम्मीद में सहन करती रही।
उपरोक्त आशय के साथ किये गये मेरे ट्वीट से यदि किसी की भावनायें आहत हुई हैं तो मैं खेद व्यक्त करता हूँ।
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ सबका विश्वास' घोषणा दिली होती. त्यावरून पटवारींनी मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती करताना मुलगा आणि मुलीच्या जन्माची तुलना केल्यानं पटवारी वादात सापडले. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मुली या देवीसारख्या आहेत. आमच्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो,' असं पटवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं.