भोपाळ: पंतप्रधान मोदींनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी आणलेल्या योजनांची तुलना मुलींच्या जन्माशी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'विकास' जन्माला यावा म्हणून मोदींनी इतर योजना आणि निर्णय देशावर लादले, असं मध्य प्रदेशचे माजी मंत्री जितू पटवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'मोदींनी नोटबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आणि मंदी आणून देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली. विकासाची आशा बाळगून जनता हे सगळं सहन करत होती,' असं म्हणत पटवारी यांनी मोदींवर निशाणा साधला. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार असताना पटवारी शिक्षण मंत्री होते. याशिवाय सध्या ते पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत. मध्य प्रदेशच्या विधानसभेत ते राऊ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
पाच मुली झाल्या, पण 'विकास' जन्मलाच नाही; काँग्रेस नेत्याच्या ट्विटनं वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:13 PM