शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 9:03 AM

स्फोटात सकाळी विशेष दलाचे दोन जवान शहीद झाले आणि एका मेजरसह चार लष्करी जवान जखमी झाले.

राजौरी : पूंछमध्ये लष्करी ट्रकवर हल्ला करणारे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कंडी जंगलाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी लष्करी जवानांनी त्यांना घेरले; परंतु दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात लष्कराचे पाच जवान शहीद झाले आणि एक मेजर दर्जाचा अधिकारी जखमी झाला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करी कारवाई अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोटात सकाळी विशेष दलाचे दोन जवान शहीद झाले आणि एका मेजरसह चार लष्करी जवान जखमी झाले. त्यानंतर उधमपूर येथील रुग्णालयात तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. ‘अजूनही कारवाई सुरूच आहे,’ असे उधमपूरमधील लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. राजौरी भागात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

लष्कराच्या उत्तरी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे ३ मे रोजी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. शोधपथकाने शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरले. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. जवळपासच्या भागांतून अतिरिक्त कुमक चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहे.

शस्त्रास्त्रे जप्त, एकाला अटकजम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका घरातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्यानंतर एका व्यक्तीला अटक केली. गुरुवारी त्रालच्या लुरगाम भागात शोधमोहीम राबवण्यात आली. झडतीदरम्यान बशीर अहमदच्या घरातून एक कलाश्निकोव्ह रायफल, दोन मॅगझिन आणि ५६ राउंड दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांकडून शोक व्यक्तजम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांनी शुक्रवारी राजौरी जिल्ह्यात झालेल्या स्फोटात पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर