गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका छोट्याश्या चुकीमुळे मृतदेहांची राग लागली. हा अपघात एतका मोठा होता की, काही वेळातच पाच जणांचे मृतदेह रस्त्यावर पसरले. मृतदेहांचे तुकडे कारमध्ये अडकले, जे कसेतरी कारमधून बाहेर काढण्यात आले. अपघाताची ही भयावह दृश्ये पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. हा अपघात उत्तर प्रदेशात झाला मात्र अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होते.
लग्न झाल्यानंतर वधू-वरांसह नातेवाईक आपल्या घरी परतत होते. मात्र, तितक्यात संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील सुजानगढ पोलीस स्टेशन हद्दीतील तांडा गावात राहणाऱ्या राकेशचे लग्न झाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील रहिवासी नेहासोबत 27 वर्षीय राकेश विवाहबंधनात अडकला. या लग्नासाठी चुरूपासून गोरखपूरपर्यंत अनेक वाहनांतून वऱ्हाडी मंडळी निघाली होती. लग्न लागल्यानंतर सर्व मंडळी राजस्थानला परतत असताना अपघात झाला आणि तो दिवस अखेरचा ठरला. राकेश आणि नेहा एका कारमध्ये बसले होते, ज्यामध्ये कुटुंबातील इतर नऊ सदस्य देखील होते. तर काही जण इतर वाहनांतून नवऱ्याच्या घराकडे निघाले होते. दुसरीकडे, तांडा गावात कुटुंबातील इतर सदस्य नववधूच्या स्वागताची तयारी करत होते.
5 जणांचा जागीच मृत्यू दरम्यान, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. उत्तर प्रदेशातून राजस्थानला परतत असताना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. काही लोक शौचालय वापरण्यासाठी खाली उतरले आणि परत बसणार होते. गाडीचा चालकही बाहेर आला होता आणि तोही गाडीच्या दिशेने जाणार होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
याशिवाय कारमधील एका महिलेचाही मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, बाबुलाल, नेमीचंद, कैलास, राकेश, तांडा गावात राहणाऱ्या नवरदेवाचे नातेवाईक मरण पावले. कारमध्ये बसलेल्या मिथलेश या महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. वधू-वरांसह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"