नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलिसांच्या ५.२८ लाख रिक्त आहेत व त्यातील जवळपास १.२९ लाख जागा तर एकट्या उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ५० हजार आणि पश्चिम बंगालमध्ये ४९ हजार जागा रिक्त आहेत. सगळ्या राज्यांत पोलिसांच्या २३ लाख ७९ हजार ७२८ जागा मंजूर असून, त्यातील १८ लाख ५१ हजार ३३२ जागा एक जानेवारी २०१८ रोजी भरलेल्या होत्या व याच तारखेला पाच लाख २८ हजार जागा रिक्त होत्या, असे गृह मंत्रालयाकडील आकडेवारीत म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या चार लाख १४ हजार ४९२ जागा मंजूर असून प्रत्यक्षात दोन लाख ८५ हजार ५४० जागाच भरलेल्या असून एक लाख २८ हजार ९५२ जागा रिक्त आहेत. बिहारमध्ये ७७ हजार ९९५ एवढे पोलीस कर्मचारी सेवेत असून तेथे मंजूर संख्या एक लाख २८ हजार २८६ आहे तर ५० हजार २९१ जागा रिक्त आहेत.पश्चिम बंगालमध्ये एक लाख ४० हजार ९०४ जागा मंजूर असून सेवेत फक्त ४८ हजार ९८१ कर्मचारीच आहेत. तेलंगणात ३० हजार ३४५ जागा रिक्त असून ७६ हजार ४०७ जागा मंजूर आहेत. नागालँड पोलीस दल देशात एकमेव दल असे आहे की २१ हजार २९२ जागा मंजूर असून ९४१ कर्मचारी जास्त आहेत.
मध्य प्रदेशात १ लाख १५ हजार ७३१ एवढे पोलीस बळ असून २२ हजार ३५५ जागा रिक्त आहेत. तमिळनाडूत पोलिसांच्या २२ हजार ४२० जागा रिक्त आहेत तर तेथे एक लाख २४ हजार १३० जागा मंजूर आहेत.कर्नाटकात पोलिसांच्या २१ हजार ९४३ जागा रिक्त असून मंजूर संख्या एक लाख २४३ एवढी आहे. गुजरातमध्ये २१ हजार ७० जागा रिक्त असून तेथे एक लाख ९ हजार ३३७ जागा मंजूर आहेत. झारखंडमध्ये १८ हजार ९३१२ जागा रिक्त असून मंजूर जागा ७९ हजार ९५० जागा मंजूर आहेत. १८ हजार तीन जागा राजस्थानात रिक्त असून मंजूर जागा एक लाख सहा हजार २३२ आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मंजूर जागा ७२ हजार १७६ असून १७ हजार ९३३ जागा रिक्त आहेत. हरियाणात १६ हजार ८४४ जागा रिक्त असून मंजूर जागा ६१ हजार ३४६ आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवायांनी त्रासलेल्या छत्तीसगडमध्ये ११ हजार ९१६ जागा रिक्त आहेत तर तेथे ७१ हजार ६०६ जागा मंजूर आहेत. ओदिशात १० हजार ३२२ जागा रिक्त असून ६६ हजार ९७३ जागा मंजूर आहेत. बंडखोरीने त्रस्त आसाममध्ये ११ हजार ४५२ जागा रिक्त असून मंजूर ६५ हजार ९८७ आहेत.सेवानिवृत्ती आणि अकाली मृत्यूमहाराष्ट्रात २६ हजार १९५ जागा रिक्त असून त्याची मंजूर कर्मचारी संख्या आहे दोन लाख ४० हजार २२४.एवढ्या मोठ्या संख्येत कर्मचारी जागा रिक्त असल्याची कारणे अधिकाऱ्यांनी भरतीची प्रक्रिया मंद असणे, सेवानिवृत्ती आणि अकाली मृत्यू सांगितली.जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७ हजार ८८२ जागा मंजूर असून १० हजार ४४ जागा रिक्त आहेत.